पुणे : गर्भसंस्कार या संस्थेतर्फे तनुश्री गर्भसंस्कार या विनामूल्य कार्यशाळेचे करण्यात आले आहे. रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स, येथे कार्यशाळा होणार आहे.
यावेळी एअर मार्शल भूषण गोखले हे प्राऊड टू बी अॅन इंडियन, तर वैद्य सुविनय दामले हे, आपले सण आणि आपल आहार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. सुप्रिया गुगळे यांनी दिली.
आपली संस्कृती ही गर्भवती महिला पर्यंत पोहोचावी, आजच्या नवीन पिढीला आपल्या भविष्यासाठी गर्भ संस्कार काय असावेत हे कळावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेची थीम म्हणजे दिल है हिंदुस्तानी असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. डॉक्टर फॉर बेगर्सचे डॉ. अभिजीत सोनावणे, डॉ. ज्योती पवार, सिनीअर पॅथॉलॉजिस्ट विजय कर्णिक, फेमिना मिसेस इंडिया लीना जैन, अभिनेत्री शुभांगी दामले आदी मान्यवर मार्गर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळेस गर्भवती महिला, नवविवाहित जोडपे, पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या डॉ. सुप्रिया गुगळे यांनी केला आहे.