नाशिक : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नाशिक येथे आयोजित केलेल्या बैठकीत, धुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. धुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मालेगाव रोडवर उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्याची सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यातील नागरीकांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य शासन कटीबध्द असल्याने, अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील, ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
निम्न पांझरा,अक्कलपाडा धरण जलसाठ्याचा आढावाही यावेळी मुख्यामंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषीमंत्री, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.