नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून सुरु असलेल्या घर-घर लंगर सेवेच्या उपक्रमाची पोलीस मुख्यालयात खासदार डॉ.सुजय विखे यांनी पहाणी केली. लंगरसेवेच्या कार्याची माहिती जाणून घेत सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, ऍड. धनंजय जाधव, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, किशोर मुनोत, विपूल शाह, अनीश आहुजा, सनी वधवा, करण धुप्पड, टोनी कुकरेजा, रोहित टेकवाणी, राम बालानी, जस्मितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, कैलाश नवलानी, विकी मेहेरा, गोविंदा खुराणा, राहुल बजाज, राजा नारंग आदिंसह लंगरसेवेचे सेवादार उपस्थित होते.
सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती व नगर पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शहरात अडकलेले, परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना दोन वेळेसचे जेवण पुरविण्याचे कार्य घर-घर लंगरसेवा करीत आहे. या लंगरसेवेच्या माध्यमातून अनेक भूकेलेल्यांना जेवण मिळाले.