वाघोली – पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय या पदाचा प्रभारी पदभार नामदेव बजबळकर, उपअभियंता यांचेकडे सोपविण्यात आला होता. तो काढून घेत प्रशासकीय कारणास्तव महापालिका सहाय्यक आयुक्त या पदाचा अतिरिक्त पदभार सोमनाथ हरिभाऊ बनकर यांचेकडे दि. २४ रोजी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सोपवला आहे.
महानगर पालिका सहायक आयुक्त पदी सोमनाथ बनकर यांनी यापूर्वी देखील कामकाज पाहिले आहे. नव्याने मनपात समावेश झालेल्या वाघोली साठी मनपा प्रशासनाकडून विविध लोकोपयोगी कामे मंजूर करण्यासाठी प्रशासन स्तरावर बनकर यांनी पाठपुरावा केला होता.
नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बनकर यांचा पुढाकार नेहमी अग्रभागी असल्याने नागरिकांमधून त्यांच्या फेरनियुक्तीचे स्वागत होत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे नगर रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःहून अतिक्रमणे काढून एक नवा आदर्श उभा केला आहे. बनकर यांच्या निवडीबद्दल वाघोली आणि पंचक्रोशीतील गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.