मुंबई – ‘चकदा एक्सप्रेस’ या आपल्या चित्रपटामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. या बायोपिकमध्ये अनुष्का क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी अनुष्काने तासंतास क्रिकेटची प्रॅक्टिस देखील केली. नुकताच अनुष्काचा मुंबईच्या रस्त्यावरील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका अतिशय जुन्या फियाट गाडीमधून प्रवास करताना दिसते.
मुंबईच्या बांद्रा या परिसरातील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये अनुष्का एका ओपन कारमधून जाताना दिसते. यावेळी तिच्यासोबत एक टेडी बेअर लूकमध्ये बसलेला व्यक्ती देखील दिसून येत आहे. अनुष्काने एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ केल्याचे समजते. ओपन कारमधून प्रवास आणि ब्रँडचा सिम्बॉल असलेला टेडी यावेळी अनुष्कासोबत असल्याचे दिसून येते.
View this post on Instagram
अनुष्काची प्रमोशनची ही हटके स्टाईल सर्वांनाच खूप आवडली. परंतु या जाहिरातबाजीमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतरांना त्रासाला समोर जावं लागलं असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. तर अनुष्काच्या अशा प्रमोशनमुळे रस्त्यावर ट्राफिक जॅम झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे.