मुंबई – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा एक सुपरहिट सिनेमा सध्या चीनमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात दमदार कमाई केली होती. सुई धागा असं या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट 2018 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता.
रिलीजनंतर बॉक्स ऑफिसपर्यंत वरुण आणि अनुष्काच्या ‘सुई धागा’ने धुमाकूळ घातला. मेक इन इंडिया मोहिमेचे चित्रण करणाऱ्या ‘सुई धागा’ बाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच हा चित्रपट चीनमध्ये देखील रिलीज होणार आहे
निर्मात्यांच्यावतीने एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये चीनी भाषेतील ‘सुई धागा’ चित्रपटाचे प्रिंट पोस्टर दिसत आहे. फिल्म क्रिटिक तरण आदर्शने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सुई धागा’ 31 मार्च रोजी चीनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘सुई धागा’ हा चित्रपट आपल्या प्रेक्षकांना एक महत्त्वाचा संदेश देतो. हा चित्रपट पती-पत्नीच्या नात्यावर तसेच भारताच्या ‘मेड इन इंडिया’ मोहिमेवर आधारित आहे. तसे, भारतातील लोकांना हा चित्रपट खूप आवडला, आता या चित्रपटाचे चिनी लोक कौतुक करतात की नाही हे पाहावे लागेल.