मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी अखेर एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज अटक करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू होती. त्यानंतर एनसीबीने रियावर अटकेची कारवाई केली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे. यातच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे.
Everybody baying for Rhea’s blood, asking questions like how did you know she didn’t do this or that to him?how do you what was he going through?are forgetting that the whole industry has actually known and seen and interacted with SSR over last 9-10 years. Yes we know better 1/2
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 9, 2020
तिच्यावर केलेल्या कारवाईवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक सेलेब्सना रियाला पाठिंबा दिल्यामुळे सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. मात्र या टीकाकारांना दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अनुराग कश्यप
“रिया गुन्हेगार आहे, हे तुम्हाला कसं कळलं? रियाला होणाऱ्या मानसिक त्रासाचा तुम्हाला अंदाज लावता येणार नाही. आम्ही सुशांतला गेल्या १० वर्षांपासून ओळखतोय. याच इंडस्ट्रीमध्ये तो काम करत होता. आम्ही सुशांतला तुमच्यापेक्षा जास्त ओळखत होतो त्यामुळे आम्ही शांत राहिलो. रियाला शिक्षा व्हावी अशी तुमची इच्छा आहे. पण हे आरोप तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर करत आहात. पण आता गोष्टी खूपच पुढे निघून गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही रियाला पाठिंबा देतोय. ” अशा आशयाचं ट्विट करुन अनुराग कश्यपने रियाला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.