मुंबई : जेष्ठ कवयित्री अनुराधा पाटील याना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी विभागातून अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला २५ फेब्रुवारीला दिल्लीत पुरस्कार मिळणार आहे.
एक लाख रुपये रोख, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्य अकादमीने बुधवारी विविध भाषेतील पुरस्कार जाहीर केले. यात सात काव्यसंग्रह, तीन निबंधसंग्रह, नॉन-फिक्शन गद्य, आत्मकथा चार कादंबऱ्या, सहा कथासंग्रह आणि चरित्रासाठी प्रत्येकी एक असे पुरस्कार जाहीर झाले.
1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या साहित्यकृतींचा विचार पुरस्कारासाठी करण्यात आल्याची माहिती साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.