केतकावळे -ज्या ठिकाणी घरांच्या प्रमाणात लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्याठिकाणी दररोज घडामोडींची माहिती घ्यावी, नगर पालिका, आरोग्य विभागातर्फे साथ आटोक्यात येईपर्यंत लांडगे आळी परिसर, इंदिरानगर, साठेनगर, सोपाननगर वाढीव हद्दीत वरचेवर थर्मल स्क्रिनिंग करणे, तालुक्यातच कोविड केअर सेंटरची आणखी उभारणी करावी, अशी मागणी सासवड शिवसेनेचे शहरप्रमुख अभिजीत जगताप शहरप्रमुख अभिजित मधुकर जगताप यांनी केली आहे.
सासवड शहरातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहर शिवसेनेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सासवड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संयुक्तपणे हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनासंदर्भात काही मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सासवड शिवसेनेचे शहरप्रमुख अभिजीत जगताप शहरप्रमुख अभिजित मधुकर जगताप, नगरसेवक सचिन भोंगळे, डॉ अस्मिता रणपिसे, माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी, युवा सेना अध्यक्ष मंदार गिरमे, मिलिंद इनामके, कुणाल जगताप, मंगेश जगताप, संतोष जगताप, मंगेश भिंताडे, अजित चौखंडे, आप्पा सकट, केदार क्षीरसागर, वैभव कोलते, गालिब इनामदार, सचिन देशमुख,राहुल घोडके, संतोष भोंगळे, अक्षय जगताप साहिल, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.