“हवेच्या माध्यमातून करोनाचा होतोय प्रसार …”

३२ देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला जागतिक आरोग्य संघटनेला इशारा

न्यूयॉर्क : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे. हवेच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. करोनाचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांच्या संशोधनातुन समोर आले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे आता जगासोमर नवे संकट उभे राहिले आहे.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती. त्यानुसार हा विषाणू हवेतून पसरत नाही असा दावा करण्यात आला होता. त्यांच्या दाव्यानुसार त्यावेळी, हा विषाणू शिंक, खोकला, कफ आणि बोलण्याच्या माध्यमातून पसरू शकतो असे स्पष्ट करण्यात आले होते.

एका इंग्रजी दैनिकाने याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या वृत्तानुसार,शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक सविस्तर पत्र लिहले आहे. करोनाचा प्रसार हवेतून होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार करोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. ते लोकांमध्ये करोनाचा संसर्ग होण्यास पुरेशे आहेत. त्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती आहे.’ हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे. २०१९ वर्षाअखेरीस चीनमधील वुहान येथे करोना व्हायरस आढळून आला होता. यानंतर आता जवळपास सर्वंच जगभरातील देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवेच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर न्यूज एजेन्सी रॉयटरने जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रतिक्रिया मागवली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.