पुणे – महापालिकेत राज्यशासनाकडून प्रतिनियुक्तीने अधिकारी पाठविणे सुरूच असून भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, वारूळे यांच्याकडे वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे.
हा पदभार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांच्याकडे होता. मात्र, सोनुने यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, क्षेत्रीय कार्यालय आणि वृक्षप्राधिकरण समितीचा पदभार असल्याने त्यांचे आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नगरसेवकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे वारूळे यांची नियुक्ती होताच सोनुने यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. वारूळे यांच्या बदलीचे आदेश राज्यशासनाकडून दि.24 जुलै रोजी काढण्यात आले होते. त्यानंतर ते 25 जुलै रोजी महापालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले