तिरुअनंतपुरम: केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका 25 वर्षीय महिलेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्या पती आणि त्याच्या मित्रांकडून करण्यात आलेल्या कथित यौनशोषण प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत पीडित महिलेच्या पतीसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना 4 जूनला घडली होती.
ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा पीडित महिलेने तिचा पती आणि त्याच्या मित्रांनी तिच्या पाच वर्षांच्या मुलासमोरच दारू पाजून अत्याचार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.