नवी दिल्ली – भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी बनारस येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. अभिनेत्री रुचिस्मिता गुरुचा 26 मार्च 2023 रोजी तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी रुचिस्मिता मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय रुग्णालयात पाठवला.
अभिनेत्री रुचिस्मिता गुरू बालंगीर शहरातील तळपलीपाडा येथील रहिवासी होती. मात्र ती सुदापाडा येथे मामाच्या घरी राहात होती. रुचिस्मिताला अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केले. तिला अभिनयासोबतच गाण्याची देखील आवड होती. तरीही तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु एका वृत्तवाहिनीनुसार, रुचिस्मिता आणि तिच्या आईचे बटाट्याचा पराठा बनवण्यावरून भांडण झाले होते.
रुचिस्मिताच्या आईने रुचिस्मिताला 8 वाजता पराठा बनवण्यास सांगितला होता. पण रुचिस्मिताने तिच्या आईला मी 10 वाजता पराठा बनवेल, असे सांगितले होते. या विषयावरुन दोघींमध्ये वाद झाला आणि काही वेळेने रुचिस्मिता मृतावस्थेत आढळली.
रुचिस्मिताने याआधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता रुचिस्मिताचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर या घटनेचा उलघडा होऊ शकतो.