अकलूज – दत्तनगर (ता.
माळशिरस) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101वी जयंती रविवारी (दि. 1) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते विक्रम मेथा बाळू कांबळे, खंडू देडे यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी भाजपचे माळशिरस तालुका युवा सरचिटणीस विनोद थिटे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी माऊली तुपे, अनिल भोसले, दिगंबर डोंगरे, असलम शेख उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादा देडे, करण सगट, देवा कांबळे, दिगंबर सोनवणे, अर्जुन देडे, बंडू खंडागळे, आबा भोरे, केरबा भोरे, तुषार कांबळे, लखन आरडे, कल्याण कांबळे, ओंकार चव्हाण यांनी परिश्रम घेतले. रवी वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. गणेश लोखंडे यांनी आभार मानले.