मुंबई – अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि रणबीर कपूरचा ऍनिमल ( Ranbir kapoor animal ) चित्रपटातील रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटानंतर अनेकांना अभिनेत्रीचे वेड लागले आहे. या सगळ्यात तृप्तीचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये ती क्रिकेटर विराट कोहलीबाबत भाष्य करताना दिसत आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चित्रपट ‘एनिमल’च्या यशामुळे चर्चेत आहे. एकीकडे तृप्ती डिमरीच्या अभिनयाने आणि लूकने सर्वजण कौतुक करत आहे. त्याच वेळी, 29 वर्षीय अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत खुलासा केला की ती भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची ( tripti dimri virat kohali ) खूप मोठी फॅन आहे.
विराट कोहलीचे चाहते जगभरातून आहेत. नुकतेच त्यात आणखी एका नावाची भर पडली. अॅनिमल या चित्रपटात झोयाची भूमिका साकारणारी तृप्ती डिमरी हिने विराट कोहली तिच्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचा खुलासा केला आहे. तिच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेलं नाही. ( Animal full movie download )
” Virat Kohli is my favourite cricketer”
– Tripti Dimri pic.twitter.com/z9TGDmIgp9
— Akash. (@akashujjwa59571) December 7, 2023
तृप्तीने 2017 मध्ये पोस्टर बॉईजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि लैला मजनू मध्ये तिची पहिली मुख्य भूमिका होती. तथापि, अभिनेत्रीला 2020 मध्ये आलेल्या बुलबुल चित्रपटातील भूमिकेमुळे ओळख मिळाली. बुलबुल हा अन्विता दत्त दिग्दर्शित सुपरनॅचरल ड्रामा चित्रपट आहे. यानंतर तृप्तीने तिच्या पुढील होम प्रॉडक्शन कालामध्ये काम केले.