Lakshmika Sajeevan : मल्याळम चित्रपट इंटस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री ‘लक्ष्मिका सजीवन’चे हार्ट ॲटॅकने निधन झाले. ( Lakshmika Sajeevan ) लक्ष्मिका सजीवन हिने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. युनायटेड अरब अमिरातमधील शरजाह येथे तिचा मृत्यू झाला आहे.
शॉर्ट फिल्म Kaakka मधून ती लोकप्रिय झाली होती. फॅन्स तिला इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली वाहत आहेत. 2 नोव्हंबरला अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेवटची पोस्ट शेअर केली होती.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये तिच्या राहत्या घरातील बाल्कनीतील फोटो होता. या फोटोला तिने ‘HOPE, light despite all of the darkness…’ असं कॅप्शन दिलं होत. Koon हा लक्ष्मिका सजीवनचा शेवटचा चित्रपट होता.
लक्ष्मीका सजीवन हिने ‘पुझायम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सऊदी वेल्लक्का’, ‘उयारे’, ‘ओरु कुट्टनाडन ब्लॉग’, ‘ओरु यमंदन प्रेमकथा’ आणि ‘नित्यहरिथा नायगन’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीचा इंस्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग असून, फॅन्स तिच्या निधनाच्या बातमी मुळे निराश झाले आहेत.