मुंबई – मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांला मारहाण केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्व आरोपींनी तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने याप्रकरणी अनिल परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनाही जामीन मंजूर केला. तसेच अनिल परब यांच्यासह स्नेहा साटम, दीपक गुटकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वाईंगणकर आणि हरी शास्त्री यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.