मुंबई – देशात लोकसभेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभेच्याही निवडणूका होण्याची शक्यता आहे असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की चार दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) तपासण्याचे किंवा ईव्हीएमचे उत्पादन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे दोन्ही निवडणुका मुदतपुर्व स्थितीत होऊ शकतात असा अंदाज बांधता येतो.
कर्नाटक निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव हे या हालचालीमागील प्रमुख कारण असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले की, कर्नाटकात पक्षाचा पराभव झाला आणि मध्य प्रदेश,
हरियाणा आणि इतर राज्यातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फोडले,” असे ते म्हणाले.