नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अनियोजितपणे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यावर पुन्हा ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले असावेत असा कयास बांधला जात आहे.
तथापि त्यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. ईडीने त्यांना २९ जानेवारी किंवा ३१ जानेवारीला चौकशीसाठी उपलब्ध आहात का अशी विचारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्लीचा दौरा झाला.
दिल्ली भेट नियोजित नव्हती.
ईडीने नवीन समन्स जारी केल्यानंतर अचानक ही योजना आखण्यात आली. २९ जानेवारीला चाईबासा, ३० जानेवारीला पलामू आणि ३१ जानेवारीला गिरीडीह येथील कार्यक्रमासह त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत. सोरेन कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी दिल्लीला गेल्याचे एका सूत्राने सांगितले. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याला दुजोरा मिळू शकला नाही.