नवी दिल्ली – काश्मीरला रेल्वे नेटवर्कद्वारे देशाच्या इतर भागांशी जोडण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. रेल्वेने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पात रामबन जिल्ह्यातील खादी ते सुंबर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. या बोगद्याची लांबी १२.७५ किमी असून या बोगद्यातून टी-४९ ट्रेन नेण्यात आली. ही ट्रेन १४१८ मीटर उंचीवर असलेल्या सुंबर रेल्वे स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.
बनिहालमधील खादी आणि सुंबड आता यूएसबीआरएल प्रकल्पाच्या १११ किमी लांबीच्या बनिहाल-कटरा रेल्वे विभागात ऑपरेशनसाठी सज्ज आहेत. आता खडी ते सुंबड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेची चाचणी यशस्वी झाली. त्यात इलेक्ट्रिक इंजिन चालवण्यात आले.
यूएसबीआरएल प्रकल्पावर काम करणाऱ्या कोकण रेल्वे आणि इरकॉनच्या अभियंत्यांनी सांगितले की, खाडी आणि सुंबड रेल्वे स्थानकांदरम्यान २५ केव्ही रेल्वे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. ३ जानेवारीला बनिहाल-खारीपर्यंतची तपासणी करण्यात आली.
खडी ते सुंबड या ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता सांगलदन रेल्वे स्थानकापर्यंत ट्रायलची तयारी रेल्वेने केली आहे. सांगलदन रेल्वे स्थानकावर ट्रॅक, प्लॅटफॉर्म व इतर कामे पूर्ण झाली आहेत. सुंबड आणि सांगलदनच्या पुलाचे कामही काही दिवसांत पूर्ण होणार आहे.