Lok Sabha Election 2024 -। नगर दक्षिण लोकसभेचे मतदान आज होत असुन भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार प्रा राम शिंदे यांनी चौंडी येथे सहकुटुंब सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यानिमित्ताने नागरिकानी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले
अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाकडुन डॉ सुजय विखे पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आ निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आ राम शिंदे यांनी दंड थोपटून कर्जत जामखेड मतदार संघ पिंजुन काढला आहे.
नगर दक्षिणची निवडणूक ही अत्यंत लक्षवेधी ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी डॉ सुजय विखे यांच्यासाठी सभा घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाकडून आ निलेश लंके यांच्या साठी शरदचंद्र पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. खा अमोल कोल्हे. खा सुप्रिया सुळे. आ रोहित पवार यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती