MPL 2024 : ट्रंकवालाची विक्रमी शतकी खेळी, छत्रपती संभाजी किंग्सचा ईगल नाशिक टायटन्सवर धडाकेबाज विजय…

Maharashtra Premier League 2024 :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत चौदाव्या दिवशी कर्णधार मूर्तझा ट्रंकवालाने(१२२धावा) याने केलेल्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. सामन्यात मुर्तझा ट्रंकवालाने(१२२) विक्रमी शतक, तर ईगल नाशिक टायटन्सच्या मंदार भंडारी(नाबाद १०२) यांनी पहिले शतक साजरे केले.
They performed 𝐨𝐮𝐭𝐬𝐭𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 tonight 🤩@ChSambhajiKings chased down a high scoring target of 2️⃣1️⃣3️⃣ & won by 7️⃣ wickets 👏#MaharashtraPremierLeague2024 #MPL2024 #ThisIsMahaCricket #T20Cricket #EagleNashikTitans #ChhatrapatiSambhajiKings pic.twitter.com/hSeP0Xh0AH
— MPLT20Tournament (@mpltournament) June 14, 2024
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं निर्णय घेतला. सलामवीर अर्शिन कुलकर्णी खाते न उघडताच तंबूत परतला. त्याला प्रणय सिंगने पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर मंदार भंडारी व साहिल पारख यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली. मंदार भंडारीने कौशल तांबेच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ७९ चेंडूत १२९ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. कौशल तांबेने ४० चेंडूत ४चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या.
मंदारने एकाबाजूने आक्रमक खेळी करत ५८चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी केली. त्यात त्याने ६ चौकार व ७ षटकार ठोकत आपले शतक साजरे केले. एमपीएलमधील या मौसमातील मंदार भंडारीचे पहिले शतक ठरले. मंदार व धनराज शिंदे यांनी चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत ४७ धावांची भागीदारी करून संघाला २१२धावांचे लक्ष्य उभे करून दिले.
२१२ धावांचे आव्हान छत्रपती संभाजी किंग्स संघाने १९.५ षटकात ३बाद २१३धावा काढून पूर्ण केले. ओम भोसले व मुर्तझा ट्रंकवाला यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ चेंडूत १४४ धावाची धडाकेबाज सलामी दिली. ओम भोसलेने ४१चेंडूत ५९धावांची खेळी करून साथ दिली. त्यात त्याने ४चौकार व ३षटकार मारले. मुर्तझाने ६३चेंडूत १२२धावांची विक्रमी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने ११चौकार व ७टोलेजंग षटकार ठोकून मैदान दणाणून सोडले. ओम भोसले आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात ५९धावांवर बाद झाला. त्यानंतर मूर्तझाने व ओमकार खाटपेच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ३०चेंडूत ५५ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले.
MPL 2024 : ओम भोसलेची तूफानी खेळी, छत्रपती संभाजी किंग्सचा विजयी चौकार…
निकाल (साखळी फेरी) – ईगल नाशिक टायटन्स: २० षटकांत ३बाद २१२ (मंदार भंडारी नाबाद १०२, कौशल तांबे ४६, धनराज शिंदे नाबाद ३०; प्रणय सिंग २-३५, आनंद ठेंगे १-४४) पराभुत वि. छत्रपती संभाजी किंग्स: १९.५ षटकांत ३बाद २१३ (मुर्तझा ट्रंकवाला १२२, ओम भोसले ५९; रेहान खान १-२२, समाधान पांगरे १-४२, मुकेश चौधरी १-४२); सामनावीर – मुर्तझा ट्रंकवाला. (१२२-६३,११x४,७x६))





