बॉलिवुडसह सर्व ठिकाणी चर्चा आहे ती फक्त आणि फक्त करोना व्हायरस बद्दलची. या व्हायरसने जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे कोणाही याबाबत रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या सिनेमांचे शूटिंग थांबवून घरी बसले आहेत.
अनेक हॉलिवूड कलाकारांना या व्हायरसचे संक्रमण झाले आहे. पण काही महत्त्वाच्या कामासाठी मात्र लोकांना घराबाहेर पडणं भाग आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राधिका आपटेला सुद्धा लंडनला जावे लागले. तिथे पोहोचल्यावर या सर्व प्रवासाचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व जे माझी काळजी करत आहेत.
त्या सर्वांना मी सांगू इच्छितेकी, मी सुरक्षितपणे लंडनला पोहोचले आहे. इमिग्रेशनमध्ये मला कोणतीही समस्या आली नाही. सर्व रिकमी होतं त्यामुळे तिथल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. हीथ्रो एक्सप्रेस पूर्णपणे रिमाकी होता. पॅडिंगटनमध्ये मोठ्या मुश्किलीने कोणतरी दिसत होते. राधिकाने तिच्या पोस्टमध्ये तिला मेसेज करून चौकशी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.