…अन्‌ कियारा आडवाणीने केली धुलाई

“कबीर सिंह’मध्ये शाहिद कपूरसोबत शानदार केमिस्ट्री आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी कियारा आडवाणी सध्या अन्य एका प्रॉजेक्‍ट्‌समध्ये बिझी आहे. तिच्याकडे एकूण पाच चित्रपट असून त्यांचे शूटिंग सुरू आहे. यातील “इंदू की जवानी’मधील काही भागाचे शूट करण्यासाठी ती लखनौला गेली होती, जिथे तिने गुंड्यांची धुलाई केली.

त्याचे झाले असे की, कियारा लखनौमधील गोमतीनगर येथील एका मॉलमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होती. या सीनमध्ये मॉलमध्ये शॉपिंग केल्यानंतर बाहेर आल्यावर काही गुंडे तिची छेड काढत असल्याचे शूट करण्यात येते. यावेळी मात्र ती गुंड्यांना घाबरण्याऐवजी थेट त्यांची धुलाई करते सीनचा शेवट करते.हा सीन शूट करताना कियारा आडवाणीला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कियारा आडवाणीच्या आगामी “इंदू की जवानी’ या चित्रपटात ती एका अशा मुलीची भूमिका साकारत आहे, जी डेटिंग ऍपचा वापर करत असते आणि त्यामुळे अनेक धमाकेदार असे किस्से घडतात. या चित्रपटाबाबत कियारासह तिच्या चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.