पुणे – सासरच्यांविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केलेल्या महिलेस तिच्या पतीने सार्वजनिक शौचालयात तलाक दिला. ही घटना लष्कर न्यायालय परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
महिलेचा पती आणि त्याचे आई-वडील, बहीण व नणंद यांनी घगुती कारणांवरून आणि एटीएम कार्ड परत घेतल्यावरून तिला मारहाण केली होती. तिने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यावरील सुनावणी लष्कर न्यायालयात सुरू आहे.
घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला तेथे गेली होती. यावेळी ती न्यायालयातील सार्वजनिक शौचालयात गेली असता, तिचा पती व इतरांनी तिला “तू आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चांगले नाही केलेस, आम्हाला काही फरक पडत नाही’. तर पतीने “तू काही पण कर माझे दुसरे लग्न ठरले आहे. मी दुसरे लग्न करणार आहे. यामुळे मी तुला तलाक देत आहे’ असे म्हणत फिर्यादीला तलाक दिला.