अनन्या पांडेने सलग 23 तास केले शुटिंग

मुंबई : अनन्या पांडेने “स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर “पती, पत्नी और वो’मध्येही तिने काम केले. ती सध्या आपला आगामी सिनेमा “खाली पीली’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये आपल्या रोलमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी अनन्या काळजी घेते आहे. अलिकडेच तिने या सिनेमाच्या शुटिंगसाठी तब्बल 23 तास सलग काम केले. आपल्या कामाच्या बाबत ती खूपच सिरीयस असते. सलग शुटिंगचे शेड्युल असले तर ती बिलकुल न कंटाळता आपले शुटिंग पूर्ण करते.

एवढेच नव्हे, तर नरेशंन्स आणि इव्हेंटमधील सहभागही ती अजिबात चुकवत नाही. “खाली पीली’च्या शुटिंगचे शेड्युल सकाळी 8 वाजता सुरू झाले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे शुटिंग सुरू होते. इतक्‍या व्यस्त शेड्युलनंतरही तिने त्याबाबत जराही त्रागा केला नाही किंवा तक्रारही केली नाही. अन्य वेळात ती आगामी सिनेमांच्या स्क्रीप्ट वाचत बसलेली असते.

त्यापैकी काही सिनेमांचे शुटिंग पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. “खाली पीली’मध्ये तिच्याबरोबर ईशान खट्टर असणार आहे. अनन्याकडे आणखी एक सिनेमाही आहे, त्यात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण असणार आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.