नवी दिल्ली : आपने मिळवलेला विजय म्हणजे दिल्लीकरांकडून मिळालेली सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच योगायोगाने सुनीता यांचा वाढदिवस होता.
भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) माजी अधिकारी असणाऱ्या सुनीता यांनी निकालानंतर आपच्या कार्यालयात प्रतिक्रिया दिली. प्रचारावेळी अनेक चढ-उतार पाहावयास मिळाले.
मात्र, आम आदमी पक्षाच्या स्वत:च्या कामगिरीवर विश्वास होता. दिल्लीने कार्याला विजयी केले, असे त्यांनी म्हटले. प्रचारावेळी केजरीवाल यांच्यावर झालेली व्यक्तिगत टीका अनावश्यक होती. राजकारणात सकारात्मकपणे संघर्ष करायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.