मुंबई – ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ‘अनन्या पांडे’चे आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर फक्त 3 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. परंतु आतापासूनच बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गनना केली जात आहे. अभिनेत्री होण्यापूर्वीपासूनच सोशल मीडियावर अनन्याची जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे.
बॉलीवूडमधील यंगस्टार आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून अनन्या पांडे हिच्याकडे पाहिलं जात. अभिनयाबरोबरच फॅशनबल लुक आणि स्टाईलसाठीही अनन्या ओळखली जाते. अनन्याच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते फिदा होत असतात. तसेच तिच्या सदाबहार ट्रेंडमुळे ती सतत प्रसिद्धिच्या झोतात असते.
असेच काहीसे फोटो अनन्याने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर भटकंतीचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘एव्हरी डे इज अर्थ डे’ असं कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहेत. या फोटोमध्ये अनन्याने व्हाईट रंगाची ब्रा व मिलटरी रंगाची पँट घातली आहे.
यावेळी ती निर्सगाच्या सानिध्यात एंजॉय करताना दिसून आली आहे. अनन्याच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहे. यामध्ये शनाया कपूरने हार्टच्या इमोजी पोस्ट करत प्रिटी अशी कमेंट केली आहे. इतर कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट आणि लाईक्स केलं आहे.