नवी दिल्ली – एडनच्या आखातामध्ये रुएन नावाच्या मालवाहू जहाजाचे सागरी चाच्यांनी अपहरण केले आहे. समोवारी या जहाजाचे अपहरण झाले. या जहाजावर १८ खलाशी होते. त्यापैकी एका खलाशाला सागरी चाच्यांनी भारतीय नौदलाच्या बोटीच्या स्वाधीन केले आहे. जखमी झालेल्या या खलाशाला उपचारांसाठी किनाऱ्यावर नेण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुटका झालेला हा खलाशी बल्गेरियाचा असून त्याच्याबाबत अधिक तपशील समजू शकलेला नाही.
सागरी सुरक्षेसाठी भारताने एडनच्या किनाऱ्याजवळ आयएनएस कोची ही विनाशिका तैनात केली आहे. दिनांक १४ डिसेंबरला माल्टाच्या मालवाहू जहाजाला चाच्यांनी ताब्यात घेतल्यानंतर नौदलाचे कमांडो घेऊन ही विनाशिका अरबी समुद्रामध्ये तैनात करण्यात आली आहे.
रकुएन हे मालवाहू जहाज भारताच्या सागरी गस्त विमानाला १५ डिसेंबरला दिसले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चाच्यांनी हे जहाज पकडले होते.
अपहरण झालेल्या जहाजाच्या सुटकेसाठी युरोपीय युनियननेव्हल फोर्सने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. या जहाजावर बल्गेरिया, अंगोला आणि म्यानमारचे खलाशी आहेत.