वॉशिंग्टन – इराणचा पाठिंबा असलेल्या हौथी बंडखोरांनी काल एडनच्या आखातामध्ये अमेरिकेच्या मायर्स डेट्रॉइट या जहाजावर ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. येमेनमधील हौथींच्या ताब्यात असलेल्या भूभागावरून अमेरिकेचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यापैकी एक क्षेपणास्त्र समुद्रात पडले. तर अन्य दोन क्षेपणास्त्रांना हवेतच पाडण्यात यश आले, असे यूएस सेंट्रलस कमांडने म्हटले आहे.
या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही किंवा जहाजाचे नुकसान झाल्याचेही वृत्त नाही, असेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनने येमेनमधील हौथींच्या ठिकाणांवर काही अतिरिक्त हल्लेही केले आहेत. सोमवारी या दोन्ही देशांच्या संयुक्त आघाडीने ८ ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. या दोन्ही देशांच्या हल्ल्यांना कॅनडा, नेदरलॅन्ड, बहरिन आणि ऑस्ट्रेलियाने सहाय्य केले होते. अलिकडे केलेल्या हल्ल्यांमध्ये हौथींची क्षेपणास्त्रे, ड्रोन यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली होती, असे वरिष्ठ लष्करी अधिकार् यांनी म्हटले आहे.