नवी दिल्ली – दिल्लीतील नारायणा गावात (Narayana gaon) असलेल्या गॅस गोदामातील कारखान्यातून हायड्रोकार्बन रासायनिक वायूच्या गळतीमुळे (gas leak) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भिऊतींचे वातावरण निर्माण झाले.
कारखान्यातून गॅस गळतीचा वास आल्यानंतर कारखाना आणि जवळची शाळा बंद (delhi school close) करण्यात आली. प्रशासनाने अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांना (ndrf) घटनास्थळी पाचारण केले आहे आणि परिसरातील लोकांना त्यांच्या घरातील कुलर आणि एसी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पोलिसांना अनेक पीसीआर कॉल्स आले
परिसरातील दुर्गंधीबाबत अनेक पीसीआर कॉल आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीच्या आधारे, योग्य एजन्सी कारवाई करत आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाय देखील केले जात आहेत. अद्याप कोणालाही रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त नाही. (Delhi gas leak news)
या प्रकरणाची माहिती समोर येताच स्थानिक यंत्रणांनी संपूर्ण परिसरात पाहणी सुरु केली.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ते परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेत आहेत. या प्रकरणातील तथ्य समोर आल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.