मुंबई – शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे त्यासाठी नियमित योगासने करण्याचा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने 2015 पासून 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता.
दरम्यान, याच दिवसाचे औचित्य साधत आज देशभरात मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा आणि बॉलिवूड कालारांचा सुद्धा सभाग असल्याचं दिसून आलं. योगाचे औचित्य साधत अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर योग करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहे.
यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा देखील सहभाग असल्याचं दिसून आलं. अमृता फडणवीस यांनी देखील आपल्या सोशल मीडियावर योग करतानाचे काही फोटो शेअर केले असून, सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी जगात कुठेही, कोपऱ्यात रहा, शरीर आणि मनाने निरोगी राहा..’ असं कॅप्शन देखील त्यांनी यावेळी आपल्या फोटोला दिल आहे.