अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथील अमोल महावीर मेथा यांची नुकतीच स्वस्त धान्य दुकान माळशिरस तालुका शासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल माळशिरस येथे तालुका पुरवठा अधिकारी वर्गाच्या वतीने त्यांचा सन्मान करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या सामाजिक कार्यातून चोख नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करणारे अमोल मेथा अशी त्यांची खंडाळी गावासह माळशिरस तालुक्यातील जनमाणसात ओळख आहे. त्यांनी खंडाळी गावासह माळेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान व गॅस वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून समाजहित जोपासले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत शासकीय स्तरावर तालुका सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांचे खंडाळी गावासह माळशिरस तालुक्यातील राजकीय, सामाजिक तसेच विविध स्तरांतून मेथा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पदाच्या माध्यमातून अमोल मेथा लवकरच आगामी काळात आपली वेगळी चुणूक दाखवतील अशी चर्चा सध्या खंडाळी पंचक्रोशीत रंगली आहे.