मुंबई – बॉलीवूडचे शेहनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आजही त्यांच्या सुपरहिट चित्रपटातील अनेक डायलॉग प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि स्टाइलने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विटर, इनस्टाग्रामच्या माध्यामातून ते अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी ‘जलसा’ बंगल्यामधील त्यांची आवडती जागा कोणती आहे? याबाबत सांगितले आहे.
एका ब्लॉगच्या माध्यमातून अमिताभ यांनी ‘जलसा’मधील त्यांच्या आवडत्या जागेचा एक छान फोटो शेअर केला आहे. यात ते त्यांच्या घरातील रेकॉर्डिंग रूममध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्या खोलीत एक मायक्रोफोन, एक मिक्सर नियंत्रक आणि रेकॉर्डिंगसाठी लागणाऱ्या इतर काही गोष्टी आहेत. यावरून बिग बी यांच्या आयुष्यात संगीत किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येते.
अमिताभ यांनी रेकॉर्डिंग रूममध्ये घालवलेले तास सर्वोत्तम आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी त्यांच्या अनुभवात संगीताच्या सामर्थ्याबद्दल लिहिले आहे की कधीकधी एखाद्याला सर्वकाही सोडून व्यावसायिक संगीताच्या सहवासात राहावेसे वाटते. शास्त्रीय शिका, त्यांनी दिलेली साधने शिका आणि तुमचे उर्वरित आयुष्य त्यांच्या सहवासात घालवा. या वातावरणात घालवलेले तास आतापर्यंतचे सर्वोत्तम असतील.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’मधील या खोलीत घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य असल्याचे म्हंटले आहे. याला कारण म्हणजे या खोलीत ते संगीताशी जोडलेले गेले आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच आर बल्की यांच्या ‘घुमर’ या चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे अमिताभ यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यामुळे बाप- लेकाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. याशिवाय अमिताभ बच्चन ‘कल्कि 2898’ मध्येही झळकणार आहेत.