Amit Shah PM Modi Cast : भारतीय जनता पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खोटे बोलणे आणि वारंवार बोलणे हे राहुल गांधींचे धोरण असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या जातीबाबत केलेल्या विधानाचा देखील शहा यांनी यावेळी समाचार घेतला.
राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या जातीवर उपस्थित केलेल्या प्रश्नाला अमित शहा यांनी उत्तर दिले. अमित शहा म्हणाले, “राहुल गांधींचे खोटे बोलणे, जाहीरपणे बोलणे आणि पुन्हा पुन्हा बोलणे हे धोरण आहे. नरेंद्र मोदींसारख्या महान नेत्यावर जातीच्या आधारावर आरोप केले जात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मोदीजी म्हणाले की मी ओबीसी आहे, ओबीसी हा एक ब्लॉक आहे, जात नाही. कदाचित त्यांच्या शिक्षकांनी राहुल गांधींना हे समजावून सांगितले नसेल.”
1994 मध्ये ओबीसी यादीत समाविष्ट
अमित शाह म्हणाले, “जड अंत:करणाने मी स्पष्ट करत आहे की, ज्या नेत्याला जग एक यशस्वी नेता मानते त्याच्या जातीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोदीजींची जात 25 जुलै 1994 रोजी गुजरातमध्ये ओबीसी म्हणून यादीत समाविष्ट करण्यात आली होती. तोपर्यंत मोदीजींनी एकही निवडणूक लढवली नव्हती असं देखील शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं.
CAA निवडणुकीपूर्वी लागू होईल
यावेळी अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात CAA लागू केला जाईल. ते म्हणाले, “मला हे स्पष्ट करायचे आहे की CAA कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. त्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे आहे.”