देशात सध्या मंगळसूत्र आणि मालमत्तेच्या मुद्दयावरून राजकीय खळबळ उडाली आहे. यासर्वात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देशात वारसा संपत्तीवर कर लावण्याचे मोठे विधान केले आहे. अमेरिकेतील शिकागो येथे मालमत्ता वितरणाबाबत वक्तव्य केलंय.
सॅम पित्रोदा यांनी वारसा संपत्तीवर बोलताना, “हा एक अतिशय मनोरंजक कायदा आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर संपत्ती कामवाली. परंतु, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही तुमची संपत्ती लोकांसाठी सोडली पाहिजे, अशी तरतूद आहे. संपूर्ण मालमत्ता नाही तर अर्धी, जी मला योग्य वाटते. पण भारतात असा कोणताही कायदा नाही. जर येथे कोणाची संपत्ती 10 अब्ज रुपये आहे. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलांना त्याची सर्व मालमत्ता मिळते, लोकांसाठी काहीही देण्यात येत नाही. मला वाटते की लोकांनी अशा विषयांवर चर्चा केली पाहिजे. या चर्चेतून काय निष्पन्न होईल माहीत नाही. आम्ही नवीन धोरणे आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलत आहोत, जे केवळ श्रीमंतांच्या हिताचे नसून लोकांच्या हिताचे असले पाहिजेत.” असे त्यांनी म्हटले. यावर आता गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले,’ काँग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात आता सॅम पित्रोदा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जेव्हा मोदीजींनी हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा संपूर्ण काँग्रेस, राहुल गांधी, प्रियांका गांधी बॅकफूटवर आले होते, मला विश्वास आहे की काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा मागे घेईल घ्या.’
‘आज सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे उद्दिष्ट देशासमोर स्पष्ट झाले आहे. आधी त्यांच्या जाहीरनाम्यात ‘सर्वेक्षण’चा उल्लेख, मनमोहन सिंग यांचे जुने विधान जे काँग्रेसचा वारसा आहे – देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे आणि आता संपत्तीच्या वाटपावर अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा यांची टिप्पणी असावी चर्चा असेही ते म्हणाले आहे.