Amit Shah | Darjeeling | Lok Sabha Election 2024 – खराब हवामानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हेलिकॉप्टर दार्जिलिंग शहरात उतरू शकले नाही. त्यामुळे त्यांची येथे आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली.
शहा हे दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजू बिस्ता यांच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीला संबोधित करणार होते.
याबाबत पत्रकारांशी बोलताना बिस्ता म्हणाले, दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २६ एप्रिलला होत आहे. पण त्यापुर्वी त्यांची येथे सभा पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
दरम्यान, सभेच्या ठिकाणी जमलेल्या नागरीकांना भाजपच्या स्थानिक लोकांना संबोधीत केले. विद्यमान खासदार बिस्ता यांच्या पाठीशी उभे राहुन मतदारांनी नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. । Amit Shah | Darjeeling