युजेन (ओरेगॉन, अमेरिका) – ओरेगॉन येथे एका संगीताच्या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 6 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार होण्यास यशस्वी झाला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या घटनेमध्ये 6 जण जखमी झाले आहेत, असे युजिन पोलीस प्रमुख ख्रिस स्कीनर यांनी माध्यमांना सांगितले. सर्व जखमींना रुग्णालयात पोहोचवले जात आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र इतरांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळू शकलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
संगीताच्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी हा गोळीबार झाला. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला असावा. त्यातून हा गोळीबार झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या हल्लेखोराबद्दल फारसा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही, असेही पोलिसांनी म्हटले आहे.