Amazon Mega Electronics Days Sale | व्हॅलेंटाइन डेच्या आधी Amazon India वर एक नवीन सेल सुरु झाला आहे. Amazon Mega Electronics sale असे या सेलचे नाव आहे. यामध्ये अनेक उत्तम डील उपलब्ध आहेत. या सेलमध्ये स्मार्ट वॉच, इअरबड्स TWS आणि लॅपटॉप इत्यादींवर अनेक डील सूचीबद्ध आहेत. या सेलबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..
Amazon Mega Electronics सेल 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत चालेल. या सेल दरम्यान, वापरकर्त्यांना कमाल 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच, SBI कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% अतिरिक्त सूट मिळेल. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचे असेल तर हा सेल तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
अनेक उपकरणे उपलब्ध –
Amazon मेगा इलेक्ट्रॉनिक्स सेल दरम्यान, टॅब्लेट, स्मार्ट वॉच, लॅपटॉप, TWS इअरबड्स, हेडफोन आणि कॉम्प्युटर ॲक्सेसरीज या सेलमध्ये सूचीबद्ध केल्या आहेत. ही सर्व उत्पादने सवलतीने खरेदी करता येतील.
TWS Earbuds वर 75% सूट –
Amazon सेल दरम्यान TWS Earbuds वर अनेक आकर्षक डील उपलब्ध आहेत. सूचीबद्ध तपशीलांनुसार, या सेगमेंटवर 75% पर्यंत सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे वर एखाद्याला भेट म्हणून TWS इअरबड्स देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.
टॅब्लेटवरही सवलत –
Apple iPad Air, Samsung S6 Lite ते Lenovo इत्यादी टॅब्लेटवर सवलत उपलब्ध आहे. सूचीबद्ध तपशीलांनुसार, येथे वापरकर्त्यांसाठी 30% पर्यंत सूट दिली आहे. तुम्ही या व्हॅलेंटाईनला एखाद्याला टॅबलेट गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.