पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. यामध्ये रिंगरोडच्या मधोमध तीस मीटर रुंदीची जागा राखीव ठेवली आहे.
“एमएसआरडीसी’ने हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच, त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली असून त्याला “राज्य महामार्गाचा दर्जा’ मिळाला आहे. या मार्गाचे “सर्वंकष प्रकल्प अहवाल’ तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
“एमएसआरडीसी’च्या या प्रस्तावित रिंगरोडची एकूण लांबी सुमारे 132 किलोमीटर असून 110 मीटर रुंदीचा तो आहे. ही रुंदी नव्वद मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. खेड शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांतून हा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी 2,300 हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये एकट्या भूसंपादनासाठी जवलपास 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रिंगरोडच्या मधोमध तीस मीटर रुंदीची जागा राखीव ठेवली आहे. पहिल्या टप्प्यात साठ मीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. भविष्यात गरज पडल्यास रिंगरोडची रुंदी वाढणे शक्य व्हावे हादेखील त्याचा उद्देश आहे.