मुंबई – साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. लवकरच अभिनेत्याच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. होय, राम चरण आणि त्याची पत्नी उपासना लवकरच आई-वडील होणार आहेत. या प्रवासासाठी केवळ कपलच नाही तर त्यांचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. नुकतंच राम चरणच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी एका ट्रोलर्सला मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अनेकदा बड्या स्टार्सना कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल व्हावं लागत. बॉलिवूडमध्ये तर हे सर्रास होते. मात्र साऊथच्या चाहत्यांना हे मेनी होताना दिसत नाही. राम चारणला सोशल मीडियात वारंवार वाईट बोलणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीला चाहत्यांनी मारहाण केल्याचं प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
प्रसिद्ध सोशल मीडिया ट्रोलर जो तेलुगू अभिनेते आणि सेलिब्रिटींना क्रूरपणे ट्रोल करण्यासाठी ओळखला जातो. अलीकडेच राम चरणच्या चाहत्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. खरं तर, या ट्रोलरने अलीकडेच राम चरण आणि त्याची पत्नि उपासना बाबत अपशब्द काढले होते. यामुळे फॅन्स या ट्रोलरवर भडकले आणि त्यांनी ट्रोलरला थेट चोप दिला.
‘RRR’ स्टारच्या सुमारे सात चाहत्यांनी ट्रोलिंग करणाऱ्या सुनिसित नावाच्या व्यक्तीचा माग काढला आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर या चाहत्यांनी ट्रोलला राम चरण आणि उपासना यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक कमेंटबद्दल माफी मागण्यास सांगितले. अभिनेत्याचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून समर्थन करत आहेत.
ఉపాసన గురించి తప్పుగా మాట్లాడిన సునిశిత్ ను చితకబాదిన రాంచరణ్ ఫ్యాన్స్ 🔥🔥🔥
Inko sari social media lo kanapadadu inka 🤣😂@AlwaysRamCharan pic.twitter.com/xaOKTna0M5
— CHE GUEVARA™ (@Karthik4PSPK) May 13, 2023
याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून अनेकांनी या ट्रोलिंगबाबत संताप व्यक्त केला आहे.यामुळे साऊथ फॅन्स आपल्या स्टार्सना किती मानतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. व्हिडिओवर अनेकांनी आपले मत व्यक्त करत हिंसा योग्य नसल्याचे म्हंटले आहे. मात्र ट्रोलिंग थांबवायचं असेल तर काहींना धडा शिकवला पाहिजे असं म्हणत चाहते हा व्हिडीओ शेअर करत आहेत.