मुंबई – दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या आगामी “पुष्पा द राइज’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. यामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
“नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्धी मिळवणारी रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत त्यांच्या बहुप्रतीक्षित “पुष्पा’ चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहेत. रिलीजपूर्वी अल्लू अर्जुन त्याच्या टीमसोबत जोरदार प्रमोशन करत आहे.
अल्लू अर्जुन म्हणाला की, हा चित्रपट तमिळनाडूमध्ये रिलीज होणे हे मला महत्त्वाचे वाटले. विशेष म्हणजे, 2020 मध्ये त्याच्या “अला वैकुंतापुरुलु’ या मागील सुपरहिट चित्रपटाने
कारकिर्दीत नवीन उंची गाठणाऱ्या अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नईमध्येच झाला होता आणि तो त्याच्या आयुष्यातील पहिली 20 वर्षे चेन्नईमध्ये राहिला होता.
“पुष्पा द राईज’ या चित्रपटात चंदनतस्करीची कथा दाखवण्यात येणार आहे. ज्याच्या विरोधात अल्लू अर्जुन लढताना दिसणार आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन स्थानिक रहिवासी पुष्पा राजची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात अर्जुन एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो लाल चंदनाची तस्करी करतो. या चित्रपटात अर्जुनव्यतिरिक्त फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.