अष्टपैलू थिसारा परेराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

कोलंबो – श्रीलंका क्रिकेट संघाने क्रिकेटविश्‍वाला एकाहून एक सरस क्रिकेटपटू दिले आहेत. कुमार संगकारा, मुथैय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा ही त्यातील काही नावे. श्रीलंकेचा अष्टपैलू थिसारा परेरा याचेही या यादीत नाव येते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या परेराने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वयाच्या 32 वर्षीच त्याने हा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकाच्या एकदिवसीय क्रिकेट संघांचे एकवेळी नेतृत्त्व केलेल्या परेराने आगामी मालिकेपूर्वी निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. 23 मे ते 27 मे या कालावधीत श्रीलंका संघ बांग्लादेश संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्या इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका होणार आहेत.

याबाबत त्याने श्रीलंका क्रिकेट संघटनलेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्रीलंकेकडून सात विश्‍वचषक स्पर्धेत खेळल्याचा मला गर्व आहे. तसेच बांग्लादेशात झालेल्या विश्‍वचषक-2014 स्पर्धेत देशाला विजेतेपद मिळविण्यात मला योगदान देता आहे. हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण होता.

आता मी निवृत्ती घेण्याची आणि युवा खेळाडूंना संधी देण्याची ही योग्य वेळ असल्याचे मला वाटते. 32 वर्षीय परेराने 6 कसोटी, 166 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे.

परेराने 12 फेब्रुवारी 2016 रोजी भारताविरुद्ध रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. यासह ब्रेट लीनंतर वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला होता. 2012 साली पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिकेत त्याने एका सामन्यात 6 विकेट्‌स घेतल्या होत्या. यात त्याने घेतलेल्या सलग 3 विकेट्‌सचाही समावेश होता.

याबरोबरच आयपीएलमध्येही त्याने सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले होते. 2010 ते 2016 या कालावधीत आयपीएलमध्ये 37 सामने खेळताना त्याने 31 विकेट्‌स घेतल्या होत्या. सोबतच 422 धावाही केल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.