बार्बाडोस – कॅरेबियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा तब्बल 140 किलो वजन असलेला रहिकीम कॉर्नवॉल याने वादळी शतकी खेळी केली. त्याने टी-20 कारकीर्दीतील पहिलेच शतक साकार करताना 4 चौकार व तब्बल 12 षटकारांची आतषबाजी केली.
बार्बाडोस रॉयल्सने सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 हून अधिक धावा केल्या. बार्बाडोसचा संघ हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचाच भाग आहे. या सामन्यात सेंट किट्स संघाने प्रथम फलंदीाज करताना 4 बाद 220 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कॉर्नवॉलने वादली शतकी खेळी करत संघाला 18.1 षटकांत 2 गडी राखून विजय मिळवून दिला.
कॉर्नवॉल आणि केल मेयर्स यांनी चांगली सुरुवाती केली. मेयर्स 13 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार फटकावले. त्यानंतर कॉर्नवॉल आणि लॉरी इव्हान्स यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शतकी मजल मारुन दिली. इव्हान्स 14 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार फटकावले.
45 चेंडूत लगावले शतक…
यानंतर कॉर्नवॉलने टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक साकार केले. त्याने अवघ्या 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार आणि 12 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यानंतर मात्र, दुखापत झाल्याने तो निवृत्त होऊन मैदानाबाहेर गेला. आपल्या खेळीत कॉर्नवॉलने 48 चेंडूत 102 धावा केल्या. कॉर्नवॉलने 102 धावा पैकी 88 धावा चौकार आणि षटकारा मारत केल्या. त्याने अनेकवेळा चेंडू मैदानाबाहेरही नेला.
कर्णधार रोवमन पॉवेलने 26 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. त्यात त्याने 5 चौकार आणि 3 षटकार फटकावले. बार्बाडोस संघाने 18.1 षटकात 223 धावा करत हा सामना जिंकला.