मुंबई – मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर शासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय नेत्यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, मराठी कलाकारांनी देखील यावर भाष्य केल्याचं दिसून आलं आहे.
यामध्ये अश्विनी महांगडे, हेमंत ढोमे यांच्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील या प्रकारावर भाष्य केलं आहे. प्राजक्ता गायकवाड हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर म्हंटलं आहे की, “रक्त उसळलंय…रक्त पेटलंय….’ याबरोबरच तिने ‘९६ कुळी मराठा’, ‘अभिमान’, ‘एक मराठा लाख मराठा’ हे हॅशटॅग वापरले आहेत. सध्या तिच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचा खूप कौतुक झालं. याचबरोबर तिचा चाहतावर्गही खूप वाढला. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती समाजात घडणाऱ्या तिला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे भाष्य करत असते. आताही तिने या लाठीचार्ज घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.