कोणत्याही देशाच्या गोलंदाजाने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना गोलंदाजी करणे म्हणजे जरा कठीणच मानले जाते. वेस्ट इंडिजच्या कोणत्याही फलंदाजाकडे पॉवर हिटिंग क्रिकेट खेळण्याचे कौशल्य आहे. याचाच एक अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रकीम कॉर्नवॉलने ( Rahkeem Cornwall ) टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे.
अटलांटा ओपन स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कॉर्नवॉलने ( Rahkeem Cornwall ) ७७ चेंडूत २०५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चौकारांपेक्षा जास्त षटकारच मारले आहेत. कॉर्नवॉलने २२ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने मैदानात धावांचा पाऊस पाडला. कॉर्नवॉलच्या या फलंदाजीतील कामगिरीची माहिती एका युजरने ट्विट करत दिली आहे.
संपूर्ण सामन्यात त्याचा फलंदाजी स्ट्राईक रेट २६६.२३ असा राहिला. त्याची ही धडाकेबाज फलंदाजी पाहून उपस्थित चाहत्यांनी मात्र सामन्याचा भरपूर आनंद लुटला. युजरने ट्विटमध्ये लिहिले की, वेस्ट इंडिजच्या रकीम कॉर्नवॉलने ( Rahkeem Cornwall ) अटलांटा फायर संघाकडून खेळताना ७७ चेंडूत २०५ धावांची खेळी खेळली. अटलांटा ओपन या नावाने ओळखली जाणारी ही अमेरिकेतील एक टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. ( Rahkeem Cornwall hit Duble Hundred in T20 Cricket )
ARE YOU NOT ENTERTAINED?!
Rahkeem Cornwall put Atlanta Fire on top with a DOUBLE century going 205*(77) with 2️⃣2️⃣ MASSIVE sixes 🤯🤯🤯 pic.twitter.com/1iRfyniiUw
— Minor League Cricket (@MiLCricket) October 6, 2022
क्रिकेट खेळात एखाद्या खेळाडूची फिटनेस खूपच महत्वाची समजली जाते. मात्र कॉर्नवॉलने अनेक वेळा शरीर अत्यंत जाडजूड असूनही मोठ्या खेळी खेळलेल्या आहेत. तो एकदा खेळपट्टीवर रुळाला की समोरच्या गोलंदाजांची चांगलीच घुलाई करतो. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट चाहते नेहमीच उत्सुक असतात.