आळंदी – फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शहरी पूर्व उच्च प्राथमिक 5 वी व पूर्व माध्यमिक 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय यश संपादन केले.
इयत्ता 5 वी मध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी 17 उत्तीर्ण झाले. इयत्ता 5 वी चा 57% निकाल लागला असून यामध्ये 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.
यात सोमेश्वर हरिभाऊ ढाकरगे (254/300), अनुष्का हनुमंत तापकिर (244/300), हरिओम रामकृष्ण जायभाये (232/300), विष्णू सुखदेव बनसूडे (220/300), गोरक्ष सुरेश राख (204/300). तसेच इयत्ता 8 वी मध्ये एकूण 26 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता 8 वी चा 27.00% निकाल लागला असून यामध्ये 6 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. यात अपूर्वा हनुमंत तापकिर (246/300), वेदांत रवींद्र भालेराव (220/300), कृष्णा भाऊसाहेब खैरे (216/300), प्रसन्न विष्णुपंत सर्जे (198/300), सृष्टी जीवन पांचाळ (198/300), साईप्रसाद अशोक कवडीकर (196/300) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख व विद्यालयाचे पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, इयत्ता 5 वी च्या समन्वयक व मार्गदर्शक पौर्णिमा मोरे व इयत्ता 8 वी च्या समन्वयक व मार्गदर्शक मनीषा कहडणे, तसेच मार्गदर्शक शिक्षक सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, प्रमोद कुलकर्णी, छाया कुऱ्हाडे, योगेश मठपती, संदीप वालकोळी या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर सर्व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या व विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करून कौतुक केले.
यानिमित्ताने या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, क्रीडा व आरोग्य समिती प्रमुख श्रीरंग पवार, शिस्त प्रमुख अमीर शेख, संजय उदमले, अनिता गावडे, सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.