आळंदी – येथील मारोतीबुवा कऱ्हाडकर मठात आयोजित श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहानिमित्त दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सप्ताहात काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन कार्यक्रम होत असून भाविक भक्तीरसात न्हावून निघत आहेत.
बुधवारी श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला आहे. ही कथा दैनंदिन दुपारी 2 ते 4 दरम्यान भागवताचार्य हभप बाळासाहेब महाराज लटपटे हे सांगत आहेत. तसेच दररोज रात्री कीर्तन सोहळ्याचेही आयोजन केले जात आहे. यामध्ये भागवताचार्य हभप बाळासाहेब महाराज लटपटे, हभप परमेश्वर महाराज जायभाये, हभप रामकृष्ण महाराज सानप, हभप आत्माराम महाराज कुटे शास्त्री, हभप आसाराम महाराज बडे, हभप रविदास महाराज सिरसाठ, हभप बापुसाहेब महाराज पंढरपूर, हभप सुदाम महाराज पानेगांवकर, हभप गणेश महाराज उखळीकर यांची कीर्तने होणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक श्री हभप श्रीनिवास महाराज उखळीकर (श्री केदारी महाराज संस्थान, उखळी बु) यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (दि.29) हभप गणेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन, खादगावकर मंडळींच्या वतीने महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.
या सप्ताहात विशेषत: परभणी आणि बीड जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. श्री क्षेत्र उखळी, खादगांव, शेंडगा, कोद्री, हरंगुळ, नंदनज, मिरवट, मांडवा, मालेवाडी, तळेगांव, कासारवाडी, तरडगांव, पारधवाडी, इंजेगांव, ढेबेवाडी, उखळी खु, पिंपळगाव गाढे, मानकादेवी, कौठळी, टोकवाडी, बेलंबा, संगम, भेंडेवाडी, वागबेट, लिंबोटा, पांगरी, कन्हेरवाडी, डाबी, भिसेगांव, आवलगांव, बोंदरगांव, नैकोटा, वडगांव स्टे. निळा, मोहळा, सांवगी, मरगळवाडी, पडेगांव, झोला, जिरेवाडी, उकडगांव, करम, कारबेटवाडी, बुकतरवाडी, लोणारवाडी, नकतवाडी, वडखेल, सेलु, परळी वै., वैजवाडी, बोर्डा, लोकरवाडी, लोणी, रेवली, वाका, पडेगांव, नागदरा येथील भाविक सहभागी झाले आहेत.
दरम्यान, सप्ताहाचे आयोजक हभप श्रीनिवास महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी महाराष्ट्रासह देशभरातील धार्मिक स्थळी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात. वृंदावन, मुक्ताईनगर, देहू, त्र्यंबकेश्वर यांसह अनेक ठिकाणी त्यांनी सप्ताहाचे आजोजन केलेले आहे. गंगाखेड, परळी तालुक्यातील भाविकांचा सप्ताहात उत्स्फुर्त सहभाग असतो.