“बच्चन पांडे’ तील अक्षयचा भीतीदायक लुक रिलीज

2021 मध्ये अक्षय कुमारचे बरेच सिनेमे रिलीज होणार आहेत. सध्या तो “बच्चन पांडे’चे शूटिंग करतो आहे. “बच्चन पांडे’ पुढच्या वर्षी 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने “बच्चन पांडे’मधील आपला लुक रिलीज केला आहे. हा लुक बघितल्यावर कोणालाही भीती वाटू शकते. सोशल मीडियावर अक्षयने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याचा एक डोळा काळा आणि दुसरा डोळा निळा दिसतो आहे.

तपकीरी शर्ट घातलेल्या अक्षयने त्याच रंगाचे कापड डोक्‍यावर गुंडाळले आहे. त्याच्या चेहऱ्यावर संतप्त प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसत आहेत. या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यत “बच्चन पांडे’चे शूटिंग सुरू झाले. अक्षय बरोबर कृती सेननदेखील या सिनेमात आहे. तिनेही शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

त्यामध्ये तिच्याबरोबर डायरेक्‍टर फरहाद समजी आणि वरदा नाडियादवालाही दिसत आहेत. “बच्चन पांडे’मध्ये जैकलीन फर्नांडिस, अरशद वारसी आणि पंकज त्रिपाठी हे देखील महत्त्वाच्या रोलमध्ये दिसणार आहेत. “बच्चन पांडे’मध्ये अक्षय कुमार एका गॅंगस्टरच्या रोलमध्ये तर कृती सेनन पत्रकार म्हणून दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.