अक्षयने 30 कोटी मानधन केले कमी

अक्षय कुमार हे बॉलिवुडमधील वेगळेच सॅम्पल आहे. जेव्हा बॉलिवुडमधील स्टार मंडळी रात्रीची पार्टी करून पहाटे घरी परतत असतात, तेव्हा अक्षय व्यायानासाठी घराबाहेर पडलेला असतो असे म्हणतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

वर्षाला तो किमान पाच चित्रपट करतो वेळेवर झोपणे, लवकर उठणे, व्यायाम अगदी सगळे टाइम टू टाइम. फार अगाउपणा नाही की पार्ट्यांमध्ये धांगडधींगा नाही. तो मुळातच आउटसाइडर. पण त्याच्या या सोवळ्या वागण्यामुळे तो अधिकच उठून दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

असो माणूस म्हणूनही अक्षय चांगला आहे. एकीकडे करिनाने एका चित्रपटासाठी 6 ऐवजी 12 कोटी रूपये मागितले असल्याची बातमी असताना अक्षयने एकदा नाही तर चक्क दोनदा आपले मानधन कमी केले आहे. अगोदर साजीद नाडीयादवालाच्या चित्रपटासाठी त्याने मानधन कमी केले. तो आता फक्त 99 कोटी रूपये घेणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ही बातमी मावळायच्या आत अक्षयने आणखी एका निर्मात्याला उपकृत केले आहे. त्याचे नाव आहे वासु भगनानी. आपल्या आगामी बेल बॉटमच्या मानधनात अक्षयने 30 कोटींचा डिस्काउंट द्यावा अशी विनंती भगनानीने अक्षयला केली होती. ती त्याने मान्य केली असल्याची बातमी आहे. अक्षय या चित्रपटासाठी 85 ते 90 कोटीच्या दरम्यान मानधन घेणार असल्याचे सांगितले जाते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

साजीद अक्षयचा बालपणीचा मित्र आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अक्षयने त्याच्यासाठी काहीतरी झळ सोसणे एकवेळ समजण्यासारखे होते. मात्र त्याने भगनानीलाही असा डिस्काउंट दिला ही मोठी गोष्ट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सध्या चित्रपट थिएटरमध्ये लागत नाही. बाहेरच अन्य प्लॅटफॉर्मवर केलेली गुंतवणूक हाच काय निर्मात्यांना अधार आहे. अशात त्यांचा खिसा वेगाने रिकामा होतो आहे. तो जर फार काळ तसाच राहीला तर अनेक निर्माते रस्त्यावर येतील. त्यामुळे अक्षयचा निर्णय योग्यच आहे. सलमाननेही राधेच्या बाबतीत असेच केल्याची बातमी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.